भास ११.२४

'भास ११.२४’ हा अनियतकालिकाचा पहिला अंक यंदा दिवाळीच्या सुमारास प्रकाशित करत असलो, तरी त्याचं भौतिक स्वरूप एखाद्या पुस्तकासारखं आहे. देखणं दर्शनी रूप; आयुष्य वाढावं अशा दृष्टीनं केलेली कागदाची, बांधणीची, आणि मांडणीची जाणीवपूर्वक निवड; आणि जाहिरातींचा पूर्ण अभाव असलेलं, रंजनाला प्राधान्य देणारं कथात्म-ललित-भाषांतरित साहित्याचं संकलन – असं याचं स्वरूप आहे. अंकातील काही गोष्टींची झलक.