आमची पुस्तकं

कितीतरी पुस्तकांच्या पीडीएफ फायली समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या दिसतात. लोक त्या हावरेपणी जमवतातही. पण त्या खरोखर वाचल्या जातात का? त्यांतल्या परिच्छेदांची रचना, त्यांतले फॉन्ट्स, ह्यांमुळे वाचताना मजा येते का? हातात घेऊन वाचण्याच्या कागदी पुस्तकातून मिळणारा सघन अनुभव त्यात नसेलही, तरीही हा अनुभव आपण अधिक वाचकाभिमुख, अधिक सुकर, आर्थिकदृष्ट्या अधिक किफायतशीर करू शकतो, व्यापकपणे उपलब्ध असलेल्या जागतिक व्यासपीठांवरही उपलब्ध करून देऊ शकतो असं वाटलं. मूळ लेखकांच्या परवानगीने खालील पुस्तकांच्या उत्तम दर्जाच्या इ-प्रती काढण्याचे काम चालू आहे. त्या लवकरच प्रकाशित करू.