स्थलांतर

by सानिया

स्थलांतर

About the Book

जगदीश आणि नंदिता यांनी एकमेकांनी लिहिलेल्या पत्रांमधून त्यांच्यामधील उत्कट आणि अनोख्या नात्याचा आपल्याला परिचय होतो.

Details

  • Publication Year: 1991
  • Genre: ललित कादंबरी - भास इ-प्रत
  • Language: मराठी
  • Pages: 144

Review

स्थलांतर कादंबरीचे लेखन त्यांनी पत्रात्मक निवेदनपद्धतीने केले आहे. जगदीश आणि नंदिता यांनी एकमेकांनी लिहिलेली ही पत्रे आहेत. त्यांच्या कादंबरीतील नंदिता, जान्हवी, सुरुची या सगळ्याच स्त्री व्यक्तिरेखा सुशिक्षित, कमवत्या, स्वत:च्या अस्तित्वाचे भान असलेल्या, स्वातंत्र्याची आस धरणार्‍या आहेत. स्वत:प्रती सजग होत जाणारी स्त्री सानियांच्या कादंबर्‍यात विशेषत्त्वाचे भेटते. स्त्रीचे अस्तित्व, तिची महत्त्वाकांक्षा, तिचे व्यक्ती म्हणून जगणे, स्वत:च्या अस्तित्त्वाचा शोध घेणे या दृष्टिकोनातूनच एका कलात्मक पातळीवर त्यांनी हे सारे चित्रण केले आहे. मुद्दाम स्त्रीवादी म्हणून त्यांनी लेखन केलेले नाही. स्त्रीच्या भूमिकेतून ‘ती एक माणूस’ म्हणून सहजपणे मांडली आहे. हेच त्यांच्या लेखनाचे वेगळेपण आहे.सानिया यांच्या या संवेदनशील, स्त्रीप्रती सजगता व्यक्त करणार्‍या साहित्याची दखल घेतली गेली असून त्यांना राज्यशासन पुरस्कार, साहित्य परिषद पुरस्कार, वर्टी पुरस्कार, वि. स. खांडेकर स्मृती पुरस्कार, जयवंत दळवी स्मृती पुरस्कार असे अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.