भास प्रकाशन
रहस्य, शृंगार, भीती, साहस, विज्ञान, अद्भुत - सर्व प्रकारच्या मनोरंजक गोष्टींचे प्रकाशक.
भास ११.२६ - आमचा तिसरा भास!
‘भास ११.२६’ (नोव्हेंबर २०२६) हा भास अनियतकालिकाचा तिसरा खंड. आधीच्या खंडांप्रमाणेच त्याचं भौतिक स्वरूप एखाद्या पुस्तकासारखं आहे. देखणं दर्शनी रूप; पुस्तकाचं आयुष्य वाढावं अशा दृष्टीनं केलेली कागदाची, बांधणीची, आणि मांडणीची जाणीवपूर्वक निवड; आणि जाहिरातींचा पूर्ण अभाव असलेलं, रंजनाला प्राधान्य देणारं कथात्म-ललित-भाषांतरित साहित्याचं संकलन यात आहे. अंकातील काही गोष्टींची झलक.
भास ११.२६ : हरवलेलं कडवं
भास ११.२६ : मुत्ती कितीपण नको वाटलं तरी बायकांवर आरडल्याशिवाय भागच नी हो! उशीर झाला की गाडीच्या हॉल्टचे पैसे मोजावं लागतात...