भास ११.२६ - आमचा तिसरा भास!
‘भास ११.२६’ (नोव्हेंबर २०२६) हा भास अनियतकालिकाचा तिसरा खंड. आधीच्या अंकांप्रमाणेच त्याचं भौतिक स्वरूप एखाद्या पुस्तकासारखं आहे. देखणं दर्शनी रूप; आयुष्य वाढावं अशा दृष्टीनं केलेली कागदाची, बांधणीची, आणि मांडणीची जाणीवपूर्वक निवड; आणि जाहिरातींचा पूर्ण अभाव असलेलं, रंजनाला प्राधान्य देणारं कथात्म-ललित-भाषांतरित साहित्याचं संकलन यात आहे. अंकातील काही गोष्टींची झलक.