भास ११.२६ : तेजसच्या कविता
तेजस यांच्या कविता
Sun Nov 01

थंड पडलेलं नाकाचं टोक
मार्ग काढत वळवतं आपल्या कथानकाचं जहाज
अजून एका रोमांचक अंधाराकडे
जे गेल्या दुपारच्या फक्क उजेडाइतकंच विस्मयजनक आहे
अंधार आपली तलम पडद्यासारखी सालं सोलत
आपल्याला आत नेत राहतो
अशा गाढ प्रदेशात
जिथे ना मग्नतेचा दिखावा करणं शक्य आहे
ना नग्नतेचा