भास प्रकाशन
पाश्चात्त्य साहित्यविश्वात ज्याला जॉन्र फिक्शन म्हणतात, तशा प्रकारच्या कथांना आपल्याकडे फारशी प्रतिष्ठा नाही. आम्हांला मनापासून असं वाटतं, की भूतकथा, गूढकथा, नवलकथा, रहस्यकथा, अद्भुतिका, विज्ञानकथा, शृंगारकथा, चातुर्यकथा, तपासकथा या सगळ्या जॉन्रांमध्ये मराठीत उत्तमोत्तम आणि बहुविध लिहिलं जावं. कविता, ललितगद्य आणि भाषांतरं या साहित्यप्रकारांचंही मराठीत एका प्रकारे अवमूल्यन झालं आहे. भाषेविषयीची, शैलीविषयीची, घाटाविषयीची, तपशिलाच्या निर्दोषपणाविषयीची जागरुकता अंतर्धान पावू लागली आहे. हे आपल्या सर्वांच्या अभिरुचीला मारक आहे. निवड आणि संस्कार, या दोन गोष्टींवर काम करायला पुष्कळ वाव आहे. आणखी एक त्रुटी म्हणजे उत्तम दर्जाच्या इ-पुस्तकांची. हातात घेऊन वाचण्याच्या कागदी पुस्तकातून मिळणारा सघन अनुभव त्यात नसेलही, तरीही हा अनुभव आपण अधिक वाचकाभिमुख, अधिक सुकर, आर्थिकदृष्ट्या अधिक किफायतशीर करू शकतो, व्यापकपणे उपलब्ध असलेल्या जागतिक व्यासपीठांवरही उपलब्ध करून देऊ शकतो. मुख्यतः आमच्या वाचनाच्या आवडीनिवडींमुळे आणि या धारणांमुळे - या सगळ्या बाबींवर कुणीतरी काम करण्याची निकड भासली. ‘भास प्रकाशन’ आणि ‘भास’ हे अनियतकालिक या दोन्ही प्रकल्पांचं हे प्रयोजन आहे.
आमच्याशी संपर्क साधा
पत्ता
इ ११४, पहिला मजला,हर हर महादेव सोसायटी, नूरी बाबा दर्गा रोड, पाटील वाडीठाणे पश्चिम - 400601
महाराष्ट्र, भारत
ईमेल
[email protected]फोन
9920193183संपादक