आमचा ब्लॉग

घोषणा, आगामी कार्यक्रम, आणि योजना...

मराठी माणसांची ‘डायजेस्टी’ परंपरा...

या लेखाचा आकार ‘वाढता वाढता वाढे...’ अशा गतीने वाढत गेला. पण माहिती आणि रंजन करणारी मासिके हा त्याचा आशय, त्यामागची सामाजिक पार्श्वभूमी आणि त्यातल्या विसंगती, त्यातून या मासिकांचे तयार होत गेलेले विशिष्ट व्यक्तिमत्त्व हे सगळे पाहता, लेख निव्वळ सुबक आकाराचा हवा म्हणून त्याचे संपादन करणे आशयाला अन्यायकारक ठरेलसे वाटले. खेरीज त्यातील अनेक तपशील सर्वसामान्य वाचकासाठी अतिशय रसाळ आहेत. प्रस्तुत लेखकासारखे काही वेडे पीर वगळता इतरांच्या हाती हे तपशील सहजासहजी लागणे मुश्किलीचे आहे. या सार्यातचा विचार करून लेखाला नैसर्गिक आकार येऊ दिला. ‘किर्लोस्करची ‘रीडर्स डायजेस्ट’ ओळख अर्थात कोंबडीआधी अंडे’ या त्याच्या पहिल्या भागात ‘रीडर्स डायजेस्ट’ या मासिकाची ओळख मराठी वाचकांना कुणी आणि कशी करून दिली याविषयीची पार्श्वभूमी दिलेली आहे. ‘चले जाव’ चळवळीच्या आधीच्या वर्षांतील वळवळ, अर्थात आद्य कामसाहित्योत्सव’ या दुसर्‍या भागामध्ये लेख काहीसे तिरके वळण घेतो आणि मराठी मासिकांना आलेले शृंगारिक नियतकालिकांचे स्वरून उलगडून दाखवतो. ‘सुप्रजननवेडकाळ अर्थात मासिकांचेही सुप्रजनन’ या तिसर्‍या भागात वासू मेहेंदळे या विलक्षण संपादकाची ओळख करून दिली आहे, तर ‘विचित्र संपादकाचे विश्व अर्थात गूगलपूर्व जगाची खिडकी’ या चौथ्या भागामध्ये ‘विचित्र विश्व’ या अजब मासिकाविषयी आणि वासू मेहेंदळे यांच्या अपूर्व दातृत्वाविषयी वाचकाला सुरस माहिती मिळते. ‘इतर डायजेस्ट अर्थात वाचकांनी नाकारलेली फौज’ या अखेरच्या भागात आजचे चित्र आणि त्यामागची कारणे यांचा शोध घेतला आहे. तरीही अनेक तपशील, अनेक नावे, अनेक मुद्दे, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अनेक आकर्षक वाटा राहून गेल्या असतील याची जाणीव आहे. तूर्त इतकेच. - संपादक, भास प्रकाशन

अधिक वाचा

Fri Mar 14

पंकज भोसले

पंकज भोसले

अतिथी संपादक


‘सायबरपंक’चे आईस-बापूस

पंक चळवळीतून आलेल्या सायबरपंक साहित्यामध्ये टोकाच्या व्यक्तिवादी विचारसरणीतून आलेला एकटेपणा, विरलेली सामाजिक वीण, आणि पात्रांनी कुणाचीतरी सोबत नि प्रेमाचा ओलावा मिळवण्यासाठी केलेली धडपड ही महत्त्वाची सूत्रे आहेत.

अधिक वाचा

Thu Feb 27

जितेंद्र (जितेन) वैद्य

जितेंद्र (जितेन) वैद्य


विक्रांतव्हर्स आणि वाचनसंकल्प

मूळच्या ओमप्रकाश शर्मांचा मानसपुत्र जगत. त्याच्या लोकप्रियतेमुळे अनेक नकली ओमप्रकाश शर्मा जन्माला आले. कुमार कश्यप हा यांपैकी एखादा घोस्ट रायटर असावा. त्याने जगत ही व्यक्तिरेखा तर उचललीच, पण त्याखेरीज जगत या पात्राला गुरुस्थानी मानणारी विक्रांत ही नवी व्यक्तिरेखा जन्माला घातली. हा विक्रांत इतका लोकप्रिय झाला, की इतर नकली ओमप्रकाश शर्मांनीही विक्रांत-कादंबर्‍या लिहाव्यात असा आग्रह प्रकाशक धरू लागले आणि त्यातूनच विक्रांत-कादंबर्‍यांची संख्या भरमसाठ वाढत गेली

अधिक वाचा

Thu Jan 09

पंकज भोसले

पंकज भोसले

अतिथी संपादक


भास घोषणा - भास आणि बिरबलाचा उंट

भास आणि बिरबलाचा उंट

अधिक वाचा

Sat Oct 12

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे


भास कशासाठी?

आपल्याला – होय, आम्हांला आणि तुम्हांलाही – या नि अशा गोष्टी वाचायला मिळाव्यात, अशा निखळ स्वार्थी हेतूनं आम्ही ‘भास’ हे अनियतकालिक सुरू करतो आहोत. वाचा, वाचायला द्या, आणि सुरसुरी आली, तर लिहादेखील.

अधिक वाचा

Fri Oct 04

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे