भास ११.२६ : हरवलेलं कडवं
काहीतरी तर हमखास गंडलेलं होतं आज. गेला जवळजवळ तासभर एकच गाणं ऐकतोय. ‘मैं वापस आउंगा’ मधलं. गाणं आधी किती वेळा ऐकलंय माहीत नाही. पण आज प्रत्येक वेळी एका ठरावीक जागी आलं की माझं लक्ष निसटत होतं...
Sun Nov 01

काहीतरी तर हमखास गंडलेलं होतं आज. गेला जवळजवळ तासभर एकच गाणं ऐकतोय. ‘मैं वापस आउंगा’ मधलं. गाणं आधी किती वेळा ऐकलंय माहीत नाही. पण आज प्रत्येक वेळी एका ठरावीक जागी आलं की माझं लक्ष निसटत होतं. सुरुवातीचा भाग नीट ऐकू यायचा. शहर, गर्दी, काम, ऊन, संध्याकाळ… सगळं. गाणं पुढे सरकत राहायचं, मीही ऐकत असायचो. मग मध्ये कुठेतरी सहा-सात ओळींचा एक भाग यायचा आणि पुढच्या क्षणी लक्षात यायचं की गाणं त्याच्या पुढे गेलंय. थांब. मध्ये काय झालं? पुन्हा सुरुवातीपासून.