भास ११.२६ : मुत्ती
कितीपण नको वाटलं तरी बायकांवर आरडल्याशिवाय भागच नी हो! उशीर झाला की गाडीच्या हॉल्टचे पैसे मोजावं लागतात...
Sun Nov 01

कितीपण नको वाटलं तरी बायकांवर आरडल्याशिवाय भागच नी हो! उशीर झाला की गाडीच्या हॉल्टचे पैसे मोजावं लागतात, हे यांच्या लक्षातच येत नी. जायची यायची ट्रीप नगदी अठराशेला पडतीय, वर ड्रायव्हरला शे-दोनशेची खुशाली वेगळी! बस्ता, चहापाणी, खाणंपिणं… यात आज कितीक होन्न मोहरा धारातीर्थी पडणारयत याचा हिसाब यांना थोडीच माहितीय!