मिस्टर ब्रुईनच्या चातुर्यकथा : उन्हाळ्यातले उलगडे

आदूबाळ

मिस्टर ब्रुईनच्या चातुर्यकथा : उन्हाळ्यातले उलगडे

पुस्तकाबद्दल

एकोणिसाव्या शतकाअखेरची मुंबई, धोतर-कोपरी नेसलेले डेप्युटी सुपरिंटेंडंट हॅरी ब्रुईन आणि त्यांचे विश्वासू सहकारी महादबा शिदोजी यांच्या चातुर्यकथांचा रंजक संग्रह.

तपशील

  • मूळ प्रकाशन वर्ष : 2026
  • प्रकार: चातुर्यकथा / रहस्यकथा
  • भाषा: मराठी
  • पृष्ठसंख्या : 140

सविस्तर...

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरची, १८९० च्या दशकातली मुंबई. गॅसबत्तीच्या प्रकाशात धावणारी व्हिक्टोरिया, क्रॉफर्ड मार्केट पोलीस चौकी, आणि त्या पार्श्वभूमीवर घडणारे अनाकलनीय गुन्हे आणि कोडी.

धोतर आणि कोपरी नेसून मुंबईच्या गल्ल्यांत लीलया वावरणारे मुंबई पोलीस दलाचे डेप्युटी सुपरिंटेंडंट हॅरी ब्रुईन आणि त्यांचे अनुभवी सहकारी महादेव शिदोजी (महादबा) यांच्या चातुर्याची ही गोष्ट.

या संग्रहातील कथा:

  • मिस्टर ब्रुईन आणि कोऽहमचे सवाल
  • मिस्टर ब्रुईन आणि उन्मत्त चंद्रफुले
  • मिस्टर ब्रुईन आणि चंद्रशेखर बाण

आदूबाळ यांच्या ओघवत्या, मिश्कील आणि वातावरणनिर्मितीने भारलेल्या शैलीतील रंजक चातुर्यकथा!