भास ११.२४ : २६ माकडं आणि अथांग विवर

नर्मदा खरे यांनी अनुवादित केलेली अद्भुतकथा, २६ माकडं आणि अथांग विवर.

Fri Nov 01

मग एक शिडी आणून ती त्या तरंगत्या टबाला टेकवते आणि टाळ्या वाजवून इशारा करते. एकामागून एक २६ माकडं पळत स्टेजवर येतात, शिडी चढून वर जातात, आणि बाथटबामधे उड्या घेतात. प्रत्येक माकडाच्या उडीबरोबर टब जोरजोरात हेलकावे घेतो. प्रेक्षकांना टबामधून डोकावणारी माकडांची डोकी, पाय आणि शेपट्या दिसत राहतात, पण मग हळूहळू सगळी माकडं शांत होतात आणि टबही स्थिर होतो. झेब नावाचं माकड नेहमीच सगळ्यात शेवटी शिडी चढतं. टबामधे उतरताना झेबच्या छातीतून एक गंभीर, घुमणारा नाद उमटतो. तो नाद स्टेजभर घुमतो. 

मग क्षणभर लखलखीत उजेड चमकून जातो, आणि टबाला अडकवलेल्या साखळ्यांपैकी दोन साखळ्या सुटून टब खाली लटकायला लागतो. त्याचा आतला भाग प्रेक्षकांच्या नजरेसमोर येतो. 

पूर्णपणे रिकामा.