भास ११.२४ : एल पावो रेआलची कहाणी
देवदत्त राजाध्यक्ष यांची मिश्किल साहसकथा, एल पावो रेआलची कहाणी
Fri Nov 01
नार्कोजमधे दाखवलं तो जुना इतिहास. आता बदललंय सगळं. पण बिझनेस चालूच आहे."
"काहीचरीत काय?” मी कसंबसं विचारलं.
”खरंच. एक डॉन तर जाम इंटरेस्टिंग आहे. अख्ख्या लॅटिन अमेरिकेतला एकमेव इंडियन डॉन. त्याची माहिती फारशी कोणाला नाही, आणि तो कोणाला भेटत नाही. पण माझी ओळख आहे. तुला भेटायचं असेल तर मी घेऊन जातो."
"अरे पण माझी सोमरावी फ्लाईट आहे,” मी बोललो, पण टेम्प्ट तर झालो होतोच.
”उद्या सकाळी जाऊ आणि रविवारी सकाळी परत येऊ. अशी संधी पुन्हा मिळणार नाही.