भास ११.२४ : अहोगद्रेंचा नंबर

आदूबाळ यांची गूढकथा, अहोगद्रेंचा नंबर

Fri Nov 01

नेहमीप्रमाणे नीरव शांततेतच अहोगद्रेने डोळे उघडले. त्याने मोबाईलमधलं घड्याळ पाहिलं. पहाटेचे तीन वाजून चार मिनिटं झाली होती. आपल्याला जाग का आली याचं कोडं उलगडत तो मिनिटभर तसाच पडून राहिला. मग त्याच्या लक्षात आलं - आवाज नाही, आवाज नाही. कसलाच आवाज नाही!