भास ११.२४ : वांझोटीचे गूढ

दिवाकर नेमाडे यांची पिशाच्चकथा, वांझोटीचे गूढ

Fri Nov 01

धर्म्यानं खिळा उचलला. जाखिणीचा मंत्र जागवत खिळा भारला. तो खिळा सरळ उजव्या हातात धरून त्यानं तो पितराच्या दिशेनं उंचावला.पितराच्या अस्तित्वात आक्रोश उमटला. ते अस्तित्व हंबरडा फोडल्यासारखं किंचाळलं.धर्म्या हसला. “जय योगिनी! जय जाखिणी! आज तुला कोण सोडवतं तेच मी पाहणार आहे.” धर्म्याचाआवाज करडा, कठोर झाला. त्या आवाजात त्वेष-द्वेष होता. “चल समोर ये – या खिळ्यावर बैस!” आणि दोरीनं कळसूत्री बाहुली ओढली जावी तसा पितर त्या खिळ्याकडं खेचला गेला.