भास ११.२४ : सातशे
जयदीप चिपलकट्टी यांचे नाटक, सातशे
Fri Nov 01
कृपाचार्य (स्वतःशीच) : तजवीज पुरेशी आहे ना हे पाहावं. (कमरेची चंची काढून पाहतो, पण त्यात काही नाही.) हं! संपलेली दिसतेय.
(आजूबाजूला आवाज देत) अरे, कुणाकडे शिल्लक आहे का रे थोडीशी?
(काही जण आपापल्या चंच्या धुंडाळण्याचा अभिनय करतात, तर काही जण त्या खरोखरीच धुंडाळतात. ‘नाही, शिल्लक नाही. संपली आहे’ अशी प्रत्युत्तरं येतात. ‘साठा करून ठेवला पाहिजे. सीनूला बोलवा. तिच्याकडे असते.’ असे आवाज जागोजागी निघतात. ‘सीनू! सीनू! कुठे आहेस तू? सीनू!’ अशासारख्या आरोळ्या सैन्यात पसरत जातात.)