
रामदास
शाळेत जाण्यापूर्वीच वाचायला सुरुवात केली होती. घरात सगळेच वाचणारे, त्यामुळे वेगळं काही कौतुक नव्हतं. ‘लिहायचे ते राहून गेले’ असं नंतर कधीतरी वाटू नये म्हणून युनिकोड आल्यावर लिहायला सुरुवात केली. सुरुवात misalpav.com वर लिहिण्यापासून झाली. आता रिटायर झाल्यावर दुसरं काहीच येत नाही, म्हणून वाचन आणि लिखाण करतो. थोडक्यात ‘बाबा गाता आणि चोट ऐकता’ अशी स्थिती आहे. वैयक्तिक संग्रहात 3000+ पुस्तकं आहेत. फ्रेममध्ये जाण्यापूर्वी ती संपवायची आहेत.
[email protected]