प्रसाद कुमठेकर
प्रसाद कुमठेकर हे लेखक, पटकथाकार, संवादलेखक आणि सर्जनशील निर्माते आहेत. मराठवाड्याची माती, तिथली बोलीभाषा आणि माणसांच्या जगण्यातील गंमतीजमती हा त्यांच्या लेखनाचा गाभा आहे. 'बगळा', 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' आणि 'अतीत कोण? मीच...' या पुस्तकांतून त्यांनी आपली स्वतंत्र लेखनशैली विकसित केली आहे. दोन दशकांहून अधिक काळ रेडिओ, दूरचित्रवाणी आणि डिजिटल माध्यमांत कार्यरत असलेल्या प्रसाद यांनी विविध लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकांचे लेखन केले आहे. माणसांचे स्वभाव, नात्यांमधील गुंतागुंत, जगण्यातील विसंगती आणि त्यांत दडलेला विनोद टिपत, ते साहित्य आणि मनोरंजनविश्वात सातत्याने कार्यरत आहेत.