जितेंद्र वैद्य

जितेंद्र वैद्य

मी जितेंद्र वैद्य. जन्म कराडचा, मोठा झालो औरंगाबादेत, आणि कॉलेज मुंबईत.

मला माणसं आवडतात आणि मला गोष्टी आवडतात. माणसांना समजावून घ्यायला, त्यांच्या गोष्टी ऐकायला आवडतं. ओघानेच सर्व प्रकारचं ललित साहित्य आवडतं. लहानपणापासून बेशिस्तपणे आणि भरपूर वाचत आलो आहे. गेली काही वर्ष मुख्यतः इंग्रजीमध्ये, पण आता गेल्या दोन वर्षांत पुन्हा मराठीत वाचायला सुरुवात केली आहे.

मी अभिजात साहित्य वाचतो, परंतु त्याबरोबरच भरपूर genre fiction वाचतो (विशेष व्यसन विज्ञानकथांचं, पण अद्भुतकथांचंही). वाचनाची आवड असणारा एखादा मनुष्य जर फक्त अभिजात साहित्यच वाचत असेल, तर त्याची वाचनाची आवड जरा संशयास्पद असते असं माझं मत आहे.

ईमेल: [email protected]