जयदीप चिपलकट्टी
सुमारे २००९-१० सालापासून मी मराठीत काही ना काही लिहितो आहे...
माझा जन्म कोल्हापूरचा. उच्च शिक्षण मुंबईत आणि नंतर अमेरिकेत झालं. सध्या मी कॅनडामध्ये गणिताचा प्राध्यापक आहे. माझं संशोधन Algebraic Geometry (अर्थात ‘भूमितीय बीजगणित’) ह्या विषयात आहे. सुमारे २००९-१० सालापासून मी मराठीत काही ना काही लिहितो आहे. तीन नाटकं, दोन ड्रॅमॅटिक डायलॉग्स, ‘lipogrammatic writing’ म्हणजेच 'बद्धलेखन', ‘Memoirs of a woman of pleasure’ (अर्थात ‘फॅनी हिल’) ह्या अठराव्या शतकातल्या अश्लील कादंबरीचं भाषांतर, मोलिएरच्या ‘Le Misanthrope’ ह्या नाटकाचं पद्य भाषांतर असं काहीसं विसंवादी लिखाण मी केलेलं आहे. माझ्या jaydeepchipalkatti.com ह्या वेबसाईटवर ते पाहता येईल.
इमेल : [email protected]