डॉ. पवनकुमार पाटील
पवन (डॉ. पवनकुमार पाटील) हा मुळात एक कलाप्रेमी. आजूबाजूच्या असंख्य छोट्या छोट्या गोष्टींकडे मोठ्या कौतुकाने आणि कुतूहलाने पाहणारा. चित्र, रेखाटन, शिल्पकला, संगीत, लेखन, या कुठल्याही कलेचा शास्त्रशुद्ध अभ्यास त्याने केलेला नाही; पण या सगळ्यांमध्ये कुठेतरी त्याचा स्वतःचा एक छोटासा अंश दडलेला आहे, असं त्याला नेहमी वाटतं.
कधी तो सलग अनेक चित्रं काढतो, तर कधी अनेक वर्षं रंगांना हातही लावत नाही. गेली चार पाच वर्षं त्याच्या हातात कुंचला आलेला नाही. तरीही त्याला घाई नाही. मनात जेव्हा पुन्हा एखादा रंग हलकेच जागा होईल, एखादी रेषा स्वतःहून उमटेल, तेव्हा तो पुन्हा चित्र काढायला बसेल, याची त्याला खात्री आहे.
व्यवसायाने तो सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करणारा संशोधक आहे. गेली अनेक वर्षं भारतातील आणि जगभरातील विविध संस्थांसोबत काम करताना माता, लहान मुलं आणि नवजात बालकांचं आरोग्य व पोषण या विषयांमध्ये त्याचा प्रवास सुरू आहे.
कदाचित म्हणूनच त्याच्या चित्रांमध्येही माणसांकडे, त्यांच्या जगण्याकडे आणि त्यातल्या न दिसणाऱ्या गोष्टींकडे पाहण्याची एक वेगळी नजर सापडते.
पवनशी संपर्क साधण्यासाठी: [email protected]
Phone: +919565371999