
विजय तरवडे
फर्गसन महाविद्यालयातून १९७४ साली अर्थशास्त्रात बी. ए. ‘भारतीय जीवन बीमा निगम’मध्ये ३७ वर्षे नोकरी केल्यावर २०११ साली प्रशासन अधिकारी पदावरून स्वेच्छानिवृत्त. गेली अनेक वर्षे केसरी, तरुण भारत, नवाकाळ, प्रभात, पुण्यनगरी, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता, सकाळ इत्यादी दैनिकांमध्ये ललित विषयांवर सदराच्या स्वरूपात किंवा नैमित्तिक लेखन चालू असते. बेळगावच्या ‘तरुण भारत’ दैनिकात २०१२पासून सलग सदरलेखन चालू आहे. आजवर ५०००हून अधिक स्फुटे प्रसिद्ध.
ओ हेन्रीच्या पन्नासहून अधिक कथांचे अनुवाद, ‘बेल आमी’ (मोपासां), ‘द एक्झॉर्सिस्ट’ यांचे अनुवाद.
करोना कालखंडात स्पर्धापरीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतिहास आणि पत्रकारिता yaa विषयांवरील सतीश चंद्र, बिपन चंद्र, आर सी भट, उमा नरुला, सुब्रमणियन स्वामी वगैरे लेखकांच्या पुस्तकांचे अनुवाद.
संजय सोनवणी लिखित ‘द अवेकनिंग’ या इंग्रजी कादंबरीच्या केलेल्या अनुवादासाठी दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी ब्लर्ब लिहिला होता.
आजवर ४८ पुस्तके प्रकाशित झाली असून ५ पुस्तके मुद्रणाधीन आहेत.