विजय बेंद्रे

विजय बेंद्रे

मला सहज काहीतरी बोलून जाता यायला हवं असं वाटतं. बहुतेकवेळा मला ते सहज बोलता येत नाही. मग मी लिहितो...

लिहायला आवडतं. लिहिण्यामागचं काही खास कारण नाही. निरीक्षण करता करता जे काही जाणवतं ते माझ्या विचारांना पटलं किंवा 'हा हे लिहून ठेवायला पाहीजे' असं वाटलं की मी लिहितो. निसर्ग आणि माणूस ह्यांचा जो सध्या रफ व्यवहार चाललेला दिसतोय तो माझ्या लिहिण्यात येत राहतो.आजीने कधीकधी मुसळधार पडलेल्या पावसाची गोष्ट सांगावी किंवा बायकोने नव्या साडीचं कौतुक सांगावं तसं मला सहज काहीतरी बोलून जाता यायला हवं असं वाटतं. बहुतेकवेळा मला ते सहज बोलता येत नाही. मग मी लिहितो. कविता आणि छोट्या छोटया डायरी वजा नोंदी लिहिताना मी रमतो.सध्या मी गावातल्या रानात वस्ती करण्याचे प्रयत्न करतोय. तिथं मी एकदा का थांबलो गुंतलो की नखात अडकल्या मातीपासून डोंगराच्या छातीपर्यंत लिहीत राहणार आहे. एवढंच.

सध्या राहायला अंबरनाथ

पूर्णवेळ पुस्तकं विक्री/वितरण व्यवसायात सक्रिय