तेजस मोडक
कविता करतो. पण ती होते तेव्हा होते, तिचा नेम नाही आणि म्हणूनच की काय, तिचं त्याला वेड आहे...
तेजस मुंबईला जाऊन-येऊन असतो, पुण्यात राहतो. सिनेमे लिहितो, कॉमिक्स तयार करतो, चित्र काढतो. प्रवासात त्याच्यासोबत असलेल्या स्केचबुकमध्ये तो पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या गोष्टी उतरवतो. कविता करतो. पण ती होते तेव्हा होते, तिचा नेम नाही आणि म्हणूनच की काय, तिचं त्याला वेड आहे. विविध पद्धतींचं वाचन, अनेक प्रकारचे सिनेमे, मनसोक्त भटकंती, उत्तम ओळखीच्या व अनोळखी चवी, दृश्यं, संगीत, मोकळ्या गप्पा, एक मग्न आंतरिक अवकाश आणि भरपूर काम यांत त्याचं साकल्य आहे.
तेजसच्या कवितांचा (थोड्या जुन्या, कारण त्याने अनेक दिवसात तो अपडेट केलेला नाही), ब्लॉग https://tejasmodak.wordpress.com इथे आहे.