सानिया

सानिया

सानियांनी सुरुवातीला कथा हा वाङ्मयप्रकार हाताळला. शोध हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९८० मध्ये मौज प्रकाशनाने प्रकाशित केला. त्यानंतर खिडक्या (१९८९), भूमिका (१९९४), वलय (१९९५), परिमाण (१९९६), प्रयाण (१९९७) इ. कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे अनुभव, त्यांना जे लिहायचं, सांगायचं, व्यक्त करायचं आहे ते लघुकथा या वाङ्मयप्रकारात व्यक्त करणं अशक्य वाटल्यावर सानियांनी दीर्घकथा लिहिल्या. प्रतीती (१९८९), दिशा घराच्या (१९९१), ओळख (१९९२), आपण आपले (२००३), ओमियागे (२००५), अशी वेळ (२०१०), सुरुवातीचे दिवस (२०२०) हे त्यांचे दीर्घकथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. विषयाचा आवाका आणि अभिव्यक्ती दीर्घकथेच्याही पलीकडची आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी कादंबरी लेखन केले. स्थलांतर (१९९०), आवर्तन (१९९६), अवकाश (२००१), निरंतर वाटेवर (२०२३) या त्यांच्या काही कादंबर्‍या. प्रवास (२००९), काही आत्मिक..काही सामाजिक (२०२४) ही ललित लेखनाची पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत.

स्वत:प्रती सजग होत जाणारी स्त्री सानियांच्या कादंबर्‍यात विशेषत्वाने भेटते.