हृषीकेश गुप्ते

हृषीकेश गुप्ते

शिक्षणाने आणि व्यवसायाने केमिकल इंजिनियर. कोकणातील रायगड जिल्ह्यातल्या नागोठणे गावी जन्म. शिक्षणासह वयाची सुमारे पहिली पंचवीस वर्षे गावी राहिल्यानंतर आता पुण्यात स्थायिक. सन २००० सालापासून लेखनास सुरुवात. सन २००० पासून विविध नियतकालिकांतून लेखनप्रसिद्धी. दंशकाल, चौरंग या कादंबऱ्या; काळजुगारी, हाकामारी या कादंबरिका; आणि घनगर्द, अंधारवारी यांसारख्या कथासंग्रहांसोबत एकूण दहा पुस्तके प्रकाशित. ‘दिल, दिमाग और बत्ती’, आणि ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’, तसंच ‘जारण’ या मराठी सिनेमांचे लेखन आणि दिग्दर्शन.

[email protected]