रोहित दिलीप होळकर

रोहित दिलीप होळकर

मला वाचनाची आवड आहे. ‘छान’ वाटणारं काहीही मी वाचतो. सहसा मला मराठी लिखाण भावतं. ‘छान’ चित्रपट-मालिका पाहायला आवडतं. हे ‘छान’ जे आहे, ते ज्ञानवर्धक वा निव्वळ मनोरंजक असं कोणत्याही जॉन्रचं असू शकतं!

काम नसताना माफक गर्दीच्या जागी चहा पिता पिता लोकांना पाहणं आणि डोकं भरकटेल तसा विचार करणं ही बऱ्याच काळापासून चिकटलेली सवय आहे. आजकाल भरकटलेले विचार करताना डोक्यामध्ये कथा रचल्या जातात. तास न् तास लांबलेल्या गप्पांमध्ये मित्रांना ह्या कथा सांगायला मजा येते.

मी व्यवसायाने गणितसंशोधक आहे. सध्या गणितामध्ये कल्पनांचे ओघ शोधायची नि कथा-चित्रपट ह्यांमध्ये गणिती सुसूत्रता शोधायचा नाद लागला आहे!