रेणुका खोत
निकड म्हणून जे उघडं-नागडं-खरं लिहावं वाटतं त्याने रिलिफ मिळतो...
मी रेणुका खोत. मुंबईत राहते. खूप मोठा काळ रिचवून-पचवून झाल्यावर निकड म्हणून जे उघडं-नागडं-खरं लिहावं वाटतं त्याने रिलिफ मिळतो. लोकांना आवडेल असं लिखाण कसं करायचं ते समजत नाही आणि मला त्याची फारशी पर्वाही नाही. हे चांगलं की वाईट ते मला ठरवता येत नाही. चहा, वाफेवरचे पोहे, सिनेमे, घरातला एखादा कोपरा पकडून निवांत-शांत असणं हे माझं रूटीन मला प्रिय आहे. माणसाने सारखं उकळत्या पाण्याच्या बुडबुड्यासारखं असलं पाहिजे असं आधी वाटायचं. आता मात्र ती धग, तो वेग मला मानवत नाही. बोलायला, ऐकायला आवडतं, पण माझ्याभोवतीचं माणसांचं वर्तुळ मर्यादित आहे.