
प्रकाश ठोंबरे
प्रकाश ठोंबरे कलाकार, रेखाटक आणि ‘ओडिसी टेल्स' या संस्थेचे संस्थापक आहेत. अॅडव्हर्टायझिंग, ॲनिमेशन, ब्रॅण्डिंग, यूजर एक्सपिरियन्स आणि व्हिज्युअल डिझाईन या क्षेत्रांतल्या चार दशकांच्या अनुभवानंतर हे सर्व बाजूला ठेवून सध्या ‘आयुष्य जसे घडते, जसे दिसते, तसे त्याचे रेखाटन करणे’ हे त्यांचे ध्येय आहे.
फाउंटन पेने आणि स्वतःच्या हाताने बनवलेली इतर आयुधे वापरून ते भारतातल्या विस्मृतीत गेलेल्या कोपऱ्यांच्या आठवणींना रेषांचे मूर्त स्वरूप देतात. डिझाईनची शिस्त आणि गोष्ट सांगण्याची ऊर्मी या दोन्ही गोष्टी एकत्र करून अनुभवाची घनता, स्तब्धता, आणि मनुष्यत्वाचा गाभा पकडण्याचा प्रयत्न करतात.
ईमेल: [email protected]