परिणीता दांडेकर
जग ओव्हरऑल भारी आहे आणि त्यातल्या छोट्या गोष्टी सांभाळण्यात आनंद आहे...
मी सध्या ऑस्टिन आणि पुण्यात राहते. साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅमस् , रिव्हर्स अँड पीपल या संस्थेसोबत गेली १५ वर्षं काम करत आहे. वाहत्या नद्या, भरलेली शेतं, निगुतीने फुलवलेल्या बागा, उत्तम अत्तरं, पर्शियन गालिचे, कुत्री, मांजरं, आणि कोल्हे मला फार आवडतात. घुबडं आणि जुनी झाडंपण. खूप बोलण्याची, फक्त विचारच करण्याची भीती वाटते. जग ओव्हरऑल भारी आहे आणि त्यातल्या छोट्या गोष्टी सांभाळण्यात आनंद आहे.