
पंकज भोसले
‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीचे फीचर एडिटर. दीड दशकापासून पत्रकारितेमध्ये कार्यरत.
‘मुंबई सकाळ’मधून लेखनास सुरुवात. ‘लोकसत्ता’मधील ‘बुकमार्क’ या शनिवारच्या पानासाठी विपुल लेखन.
या लेखनासाठी मुंबई विद्यापीठाचा अरुण टिकेकर पुरस्कार २०१८ साली आणि विश्व संवाद केंद्र , मुंबई येथील देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान २०१९ साली मिळाला. रहस्यकथा या दुर्लक्षित लेखनप्रकाराच्या अभ्यासासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची २०१९ सालातील अभ्यासवृत्ती मिळाली. त्याद्वारे राज्यभर पुस्तकभटकंती.
जुनी आणि दुर्मीळ मराठी पुस्तके वाचविण्यासाठी आणि त्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठीच फक्त समाजमाध्यमांमध्ये कार्यरत.
लेखकाची प्रकाशित पुस्तके : विश्वामित्र सिण्ड्रोम, हिट्स ऑफ नाईण्टी टू.\