
इर्शाद बागवान
माझं पूर्ण नाव इर्शाद शफी बागवान. शिक्षण एस्. वाय. बी. ए. पर्यंत.
२०१५मध्ये फेसबुकवर लिहायला सुरुवात केली.
२०१८, २०१९, २०२०, २०२४ : प्रतिबिंब, आवाज, मिळून साऱ्याजणी, शब्द ईदोत्सव, पृथा, दिव्य मराठी इ. दिवाळी अंकांसाठी कथालेखन केले.
कोरोनाकाळात ‘निजामचाचा की तारांबळ’ नावाची दहा अंकांची मालिका लिहिली, जी किरण माने या मराठी कलाकाराने एकपात्री शूट केली. नंतर ती वाघोबा प्रॉडक्शनने यूट्यूबवर प्रसारित केली.
२०१८मध्ये वर्षभर लहान मुलांसाठी ‘नटखट न्हनापन’ नावाची २३ अंकांची लेखमालिका लिहिली, जी दिव्य मराठी या दैनिकाच्या रसिक पुरवणीमध्ये प्रकाशित झाली.
साहित्य मंडळाच्या पुरस्कारप्राप्त ‘मायबोली’ या पुस्तकासाठी दखनी बोलीभाषेतील कथा लिहिली.
दखनी तसेच मराठीमध्ये काही कविता लिहिल्या.
तीन अपूर्ण कथा आणि एका मराठी कथेचा अनवुाद सुरू आहे.
मुख्यत्वे दखनी आणि प्रमाण मराठी या भाषांमध्ये लेखन केले.