दिनकर मनवर
कवी, चित्रकार...
शेगाव येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘शब्दवेध’ या अनियतकालिकाच्या संपादन मंडळात काही वर्षे सहभाग. दागो काळे यांचेसमवेत ‘अतिरिक्त’ या अनियतकालिकाचे संपादन. मागील पंचवीस वर्षांपासून कवितालेखन, जमेल तसे - जमेल तेव्हा चित्रे व रेखाटणे काढणे. विविध नियत-अनियतकालिकांमध्ये कविता प्रसिद्ध. काही कवितांचे इंग्रजी, हिंदी, व बंगाली भाषेत अनुवाद.
आजपर्यंत ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’, ‘अजूनही बरंच काही बाकी’, ‘पाण्यारण्य’, ‘वामांगी’ व ‘आई, मन्या व राक्षस’ हे पाच कवितासंग्रह प्रसिद्ध.
कवितेसाठी बाराशीव साहित्य पुरस्कार, धाराशीव; महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार; गजहिंग्लज नगर परिषदेचा पूज्य साने गुरूजी पुरस्कार; मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद यांचे वतीने दिला जाणारा लीला धनपलवार काव्य पुरस्कार; शिवाजी विद्यापीठामार्फत देण्यात येणाऱ्या पंडित आवळीकर काव्य पुरस्कार; तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या मोटार वाहन विभागातून वरिष्ठ परिवहन उप-आयुक्त या पदावरून सेवानिवृत्त.
सध्या मंबई येथे वास्तव्य.
संपर्क : ८१०८६८३९१९
ई मेल : [email protected]