देवदत्त राजाध्यक्ष

देवदत्त राजाध्यक्ष

व्यर्थी अधिकचि अर्थ वसे ...

देवदत्त राजाध्यक्ष हा इसम मुंबईत राहतो, आणि स्टार्टअप कंपन्या आणि व्हेंचर कॅपिटल फंड यांसाठी अर्धवेळ (अर्धवट नव्हे!) मुख्य आर्थिक अधिकारी (Fractional CFO) म्हणून काम करतो.

देवदत्तला पुस्तकं वाचायला व जमवायला आवडतं. सोविएत रशियन बाल-कुमार साहित्याबद्दल 'धुक्यात हरवलेले लाल तारे' या माहितीपटाची निर्मिती त्याने व दोन मित्रांनी केली आहे.

कथा-कविता लिहिण्याच्या त्याच्या बालपणापासूनच्या खोडीला सोशल मिडियामुळे स्फुरण चढलं, आणि आपल्या नावापुढे 'वाॅम्बल' हे उपनाम जोडून तो फॅण्टसी या मथळ्याखाली काहीबाही लिहू लागला. त्याच्या लेखनाबद्दल 'व्यर्थी अधिकचि अर्थ वसे' असा (गैर)समज झालेल्या हितचिंतकांनी त्याचं काही लेखन छापील व ऑनलाईन अंकांमध्ये प्रकाशित केलं. पुढेमागे कधीतरी हे लेखन एका ब्लाॅगवर प्रकाशित करायचा त्याचा मानस आहे.

त्याचा ईमेल आयडी [email protected] हा आहे. (फॅनमेलची वाट बघतोय.)