
अमोल उदगीरकर
अमोल उदगीरकर हे चित्रपट समीक्षक , मुक्त पत्रकार आणि पटकथालेखक आहेत . त्यांनी २००६ साली आपलं मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पुणे विद्यापीठातून पूर्ण केलं . काही काळ पत्रकारिता केल्यावर त्यांनी लेखक म्हणून फ्रिलान्सर म्हणून काम सुरु केलं . त्यांनी दैनिक सकाळ , दैनिक लोकसत्ता , दिव्य मराठी , दैनिक लोकमत , दैनिक पुढारी , दैनिक पुण्यनगरी या वर्तमानपत्रांसाठी सातत्याने चित्रपटविषयक आणि इतर विषयांवर लिखाण केलं आहे . त्याचबरोबर 'अक्षरनामा ' आणि इतर काही वेबपोर्टल्ससाठी पण लिखाण केलं आहे . बहुतेक मराठी वृत्तवाहिन्यांवर चित्रपटविषयक चर्चांमध्ये त्यांनी पॅनलिस्ट म्हणून हजेरी लावलेली आहे . त्यांचा मराठी भाषेतला ब्लॉग हा मराठी आंतरजालावर अतिशय लोकप्रिय आहे. अमोल उदगीरकर यांनी लिहिलेल्या 'न नायक ' पुस्तकाला ज्यात भारतातल्या गुणवान पण दुर्लक्षित अभिनेत्यांवर लेख आहेत , पण वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. अमोल यांची मिडनाईट मॅटीनी आणि नव्वदीच्या आल्याड पल्याड ही पुस्तके प्रकाशित झाली असूनअजून एक पुस्तक लवकरच प्रकाशित होऊन बाजारात येणार आहे . अमोल उदगीरकर यांनी काही वेबसीरिजचं लिखाणही केलं आहे.