अंबिका सरकार

अंबिका सरकार

अंबिका सरकार (१९३२ : २०२३)

अंबिका सरकार सिडनॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. त्यांनी अनेक लघुकथा आणि कादंबऱ्या लिहिल्या.

'प्रतीक्षा', 'चाहूल', 'शांतवन' हे कथासंग्रह, तर 'अंत ना आरंभही' आणि 'एका श्वासाचं अंतर' या त्यांच्या कादंबऱ्या. आंतोन द सेंत एक्झ्यूपरीच्या 'द लिटिल प्रिन्स'चा गाजलेल्या कादंबरीचा तसेच बर्नार्ड श्लिंक यांच्या द रीडर या मूळ जर्मन कादंबरीचा अनुवादही त्यांनी केला आहे.

मराठी स्त्रीवादी साहित्यप्रवाहात त्यांचं स्थान महत्त्वाचं आहे.