आदूबाळ

आदूबाळ

रंजन करणं हे साहित्याचं मूलभूत काम आहे...

आदूबाळ इंग्लंडमध्ये राहतो आणि ललितलेखन वगैरे गोष्टींशी संपूर्ण विसंगत असलेली नोकरी करतो. त्याला लहानपणापासून मराठी ललितलेखन करायचा किडा होता, पण प्रत्यक्ष लेखन करण्याचा, आणि ते प्रकाशित करण्याचा धीर २०१२ साली आला. तेव्हापासून तो नियमित मंदगतीने कथा लिहितो आहे. 'रंजन करणं हे साहित्याचं मूलभूत काम आहे' या तत्त्वावर आदूबाळाचा गाढ विश्वास आहे. (हे तत्त्व चूकही असू शकतं, पण आदूबाळाची त्यावर श्रद्धा आहे.) त्याच्या कथा वाचकांचं रंजन करत असाव्यात असा त्याला संशय आहे, पण किमान त्या त्याचं स्वतःचं तरी रंजन करतात हे नक्की. आदूबाळाचं लेखन मुख्यत्वे मराठी संस्थळांवर इतस्ततः विखुरलं आहे. ते एकदा एकत्र करून एका ब्लॉगवर चिकटवायला पाहिजे पण तेवढी शिस्त त्याच्या अंगी नाही.

[email protected]