भास १०.२५ : राजाराणीची गोष्ट
वसीमबार्री मणेर यांची कानशिलं तापवणारी शृंगार कथा
Fri Oct 03
…जाणीवपूर्वक व्यायाम, डायट करून सांभाळलेलं शरीर. मनगटावरचं डिजिटल घड्याळ कॅलरीजवर करडी नजर ठेवून. काळजीपूर्वक केलेला पेहराव. पार्लर, स्पा करून कमावलेली त्वचा. उत्तम ब्रा. आधीच गोरी असलेली फाराह या सगळ्यामुळे एकदम उठून दिसे. फक्त सिगरेट हीच एक गोष्ट या सगळ्यात फिट न बसणारी होती. पण त्याशिवाय फाराहला जमत नसे.
“या सीझनमध्ये कैरी माझ्या नशिबातच नाही बहुतेक!” म्हणत गिरीश फाराहच्या टेबलवर आला. फाराहनं सिगरेट एका हातात, बाजूला घेतली, उभी राहिली, मान डावीकडे केली, आणि ओठांचा चंबू करून धूर बाजूला सोडला. मग गिरीशला एक घट्ट आलिंगन दिलं. आलिंगन सोडलं आणि त्याच्या ओठांवर ओठ ठेवले, अलग केले.
“यॉर स्मोकी वॉर्म लिप्स! दे किल मी!” गिरीश तोंडातल्या तोंडात पुटपुटला. ते ऐकून फाराह सुखावली. तिच्या चेहर्यावर स्तुतीनं तृप्त होणारं आणि माज वाढवणारं स्मित आलं…