भास १०.२५ : घर
शिल्पा पाठक यांची ललित कथा
Thu Oct 02
…दारावर थाप पडण्याआधीच त्याची बरीचशी तयारी झाली होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हवेत एक प्रकारचा तणाव जाणवत होता. तीन आठवडे पावसाचा थेंबसुद्धा नाही, पारा मात्र सतत ३०-३५ अंशांच्या वर. वाळून अगदी करपून गेलेलं गवत. शुष्क हवा. आजूबाजूला पाहिलं की त्याला लाकडाच्या वखारीत असल्यासारखं वाटे. एक ठिणगी पडायचा अवकाश! त्यात काल संध्याकाळी कोरड्या गरम वाऱ्यांबरोबर अपेक्षेनुसार धुराचा वास आला. त्यापाठोपाठ रेडिओवर काही बातम्या आल्या. त्या ऐकल्यावर त्याने आवराआवर करायला सुरुवात केली…